पिंपरी : कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना कोव्हिड निगेटिव्ह असल्याचा दाखला देण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात ननावरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड मनपा रुग्णालयात पॉजिटीव्ह कोरोना रुग्ण आल्यानंतर त्याचे उपचार केल्यानंतर तो पूर्णपणे बरा होतो. त्यानंतर त्याला घरी सोडताना त्याच्या डिस्चार्ज कार्ड वर तो निगेटिव्ह आहे, असा शिक्का असावा किंवा तो पुर्णपणे बरा झाला आहे, असा त्याच्यात उल्लेख करणे गरजेचे आहे. कारण रुग्ण पुर्णपणे बरा झाला म्हणून त्याच्याकडे काहीही पुरावा नसतो. त्याच्यामुळे एम. आय. डी. सी.मध्ये काम करणारा कामगार वर्ग किंवा ऑफिसमध्ये काम करणारा कामगार वर्ग यांना ते पूर्णपणे बरे झाले आहेत, याचा काही पुरावा नसल्याने त्यांना कामावर रुजू करून घेत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
फोटो- जितेंद्र ननावरे नावाने
कोरोनावर मात करणार्या व्यक्तीला निगेटिव्ह असल्याचा दाखला द्यावा










Leave a Reply