Pimpri news: ‘या’ लिंकवर घर बसल्या पहा पंतप्रधान आवास योजनेची सोडत
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात येणा-या सदनिकांची सोडत लाभार्थ्यांना घर बसल्या (Link – www.facebook.com/pcmcindia.gov.in) Live व YouTube (Link – www.youtube.com/PCMCINDIA )
या लिंकवर बघता येणार आहे. त्यामुळे सोडतीच्या ठिकाणी येण्याची आवश्यकता भासणार नाही.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी 11 वाजता केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोडत काढली जाणार आहे. या योजनेची सोडत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेसबुक पेजवर लाईव्ह दाखविली जाणार आहे. तसेच युट्युबद्वारे लाईव्ह दाखविली जाणार आहे. www.facebook.com/pcmcindia.gov.in या लिंकवर नागरिक घर बसल्या सोडत पाहू शकणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून गर्दी करु नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.










Leave a Reply