Pimpri news: शहरात कोरोनाचे 414 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात आज (शुक्रवार) 408 तर हद्दीबाहेरील 6 असे 414 नवे रूग्ण सापडले आहेत. एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 233 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात 1 लाख 4 हजार 911 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 99 हजार 743 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 837 तर हद्दीबाहेरील 772 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 2 हजार 277 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले.
1 हजार 528 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 875 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 640 घरांना भेटी देऊन 2 हजार 95 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.










Leave a Reply