Chinchwad news: हौसेला मोल नाही..! चक्क सोन्याची लग्न पत्रिका छापली
Pckhabar-हौसेला मोल नाही म्हणतात ना? याची प्रचिती पिंपरी-चिंचवड शहरात आली आहे. थेरगाव येथील रहिवाशी असलेले सदन शेतकरी नारायण बारणे यांनी आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका चक्क सोन्याची छापली आहे. त्यांनी अशा 25 पत्रिका छापल्या असून यासाठी लाखो रूपयांचा खर्च केला आहे.
नारायण बारणे यांचे चिरंजीव रोहित आणि जीवन लगड यांची कन्या वैष्णवी यांचा रविवारी पाषाण येथे विवाह होणार आहे.
या सोन्याच्या पत्रिकेबाबत नारायण बारणे म्हणाले, आम्ही गावातील सदन शेतकरी व थोडाफार राजकारणाची आवड असल्यामुळे आमच्या वार्डात 30 हजार लोक राहतात. एवढे लोक लग्नाला नक्कीच आले असते.
परंतू, आम्ही महाराष्ट्र शासनाने कोरोना संबंधित नियम पळून आम्ही हा लग्न सोहळा 50 ते 200 लोकांच्या उपस्थितीत संपन्न करीत आहोत. कोरोना नसता तर 30 हजार लोकांच्या जेवणाचा खर्च आलाच असता, तो खर्च आम्ही सोन्याच्या लग्न पत्रिकेत केला आहे.










Leave a Reply