कोरोना विरुद्धच्या लढ्यात सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे’

पिंपरी : कोरोना रुग्णांना उपचार व सेवा सुविधा देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाबरोबर सामाजिक संस्थांनी देखील स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी केले.
शहरातील ‘आपली सखी’ या सामाजिक संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कोविड -19 च्या महिल्यांच्या वॉर्डसाठी स्वच्छतागृहाचे साहित्य आपली सखीच्या अध्यक्षा संगिता तरडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे उपमहापौर तुषार हिंगे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे उपस्थित होते.
हिंगे म्हणाले की, या जागतिक महामारीचा सामना करीत असताना आगामी काळात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरुन वायसीएम रुग्णालय कोविड -19 साठी समर्पित करण्यात आले. दाखल रुग्णांना आवश्यक असणा-या सेवा सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. प्रशासनाबरोबरच शहरातील सामाजिक संस्था, संघटना, मंडळ, ट्रस्ट, उद्योजकांनी रुग्णांना सुविधा देण्यासाठी आर्थिक किंवा वस्तू स्वरुपात मदत करुन सहभागी व्हावे.
फोटो-तुषार हिंगे नावने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *