JOB News: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीव्दारे होणार भरती

JOB News: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीव्दारे होणार भरती
Pckhabar- राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध कार्यक्रमासाठी कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर विविध पदासांठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये थेट मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड होणार आहे.

तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, हवेली येथे  विविध संवर्गातील रिक्त पदांची, कंत्राटी पद्धतीने करार तत्त्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी 3, आरोग्य अधिपरिचारिका या पदासाठी 2, औषध निर्माता या पदासाठी 2, प्रयोग शाळा तंत्रज्ञ या पदासाठी 1 तर  आरोग्य सेविका या पदासाठी 8  अशा 15 जागांसाठी ही 11 महिन्यासाठी कंत्राटी पध्दतीने भरती होणार आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांची भरती थेट मुलाखतीद्वारे दिनांक  6 मार्च रोजी पार पडणार आहे.

पदभरती जाहिरात, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण अर्जाचा नमुना, नियम, अटी व शर्ती या राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे यांचे संकेतस्थळ (https://punezp.mkcl.org)  यावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.  उमेदवारांनी संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना  डाऊनलोड  करून  जाहिरातीतील आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्ज समक्ष 1 मार्च 2021 पर्यंत सादर  करावे, असे आवाहन हवेली पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *