Dehu News: येलवाडीत रक्तदान शिबीराचे आयोजन

Dehu News: येलवाडीत रक्तदान शिबीराचे आयोजन
Pckhabar- कोरोनाच्या या महामारीमुळे सर्वत्र रक्ताची नितांत गरज भासत आहे. त्यामुळे वीर सह्याद्री ट्रेकर्स आणि कर्तव्य फाऊंडेशन देहू-येलवाडी यांच्या वतीने येत्या रविवारी येलवाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
येलवाडी येथील रोकडोबा महाराज मंदिर येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या कालावधीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविद्यालय बंद असल्याने ससून रूग्णालय येथे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर मोफत रक्त देणारी रक्तपेढी ससून ब्लड बँकेला या शिबीरात जमा होणार्‍या रक्ताच्या बँगा देण्यात येणार आहे. या सद्कार्यात देहूगाव, माळवाडी, विठ्ठलवाडी, येलवाडी यासह परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वीर सह्याद्री ट्रेकर्स आणि कर्तव्य फाऊंडेशन देहू-येलवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *