Dehu news: शेतात अफूची लागवड, शेतकर्‍याला अटक

Dehu news: शेतात अफूची लागवड, शेतकर्‍याला अटक
Pckhabar- देहूगावातील एका शेतकर्‍याने त्याच्या शेतामध्ये चक्क अफूची लागवड केली. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी त्या शेतकर्‍याला अटक केली आहे.

जालिंदर विनायक काळोखे (वय 60, रा. काळोखे मळा, विठ्ठलनगर, देहूगाव) असे अटक केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक संतोष जाधव यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जालिंदर काळोखे हे शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या शेतात अफू या अंमली पदार्थांच्या झाडाची लागवड केली. याबाबत देहूरोड पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी बुधवारी रात्री त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळी अफूची लागवड केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी जालिंदर काळोखे यांना अटक केली आहे. देहूरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.