Pimpri Corona news: धोका वाढतोय… नागरिकांनो वेळीच सावध व्हा !

Pimpri Corona news: धोका वाढतोय… नागरिकांनो वेळीच सावध व्हा
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर गेल्या तीन महिन्यानंतर बुधवारी एकाच दिवशी तब्बल 425 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरवासियांनी वेळ सावध होऊन कोरोना संबंधीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

बुधवारी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 440 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात बुधवारअखेर 1 लाख 4 हजार 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 99 हजार 53 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 833 तर हद्दीबाहेरील 772 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी 1 हजार 856 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 132 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 637 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 443 घरांना भेटी देऊन 1 हजार 239 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *