Pimpri crime news: प्रेमसंबंधातून झालेल्या चार महिन्याच्या मुलीचे अपहरण आणि सुटका
Pckhabar-तरूण-तरूणीच्या प्रेमसंबंधातून झालेली मुलगी एका ओळखीच्या व्यक्तीला दिली. व्यक्तीकडे कामासाठी आलेल्या महिलेने मुलीचे अपहरण करून बीडला पलायन केले. अपहरण प्रकरण करून पलायन केलेल्या आरोपी महिलेला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.
राणी शिवाजी यादव (वय-28, रा. अंबाजोगाई) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत राजेंद्र प्रभाकर नागपुरे (वय-53, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या एका तरूण-तरूणीच्या प्रेमसंबंधातून मुलगी झाली. त्यांनी चाकण येथील एका खासगी दवाखान्यात मुलीला जन्म दिला.
त्याठिकाणी कामासाठी आलेल्या राजेंद्र नागपुरे यांच्याशी त्यांची ओळख झाली. यातून तरूण-तरूणीने नागपुरेला मुलगी दत्तक दिली. त्यांनी मुलीला चार महिने सांभाळ केला. चाकण येथे पुर्वी राहण्यासाठी असलेल्या राणी शिवाजी यादव हिने नागपुरे यांच्याकडे कामाच्या बहाण्याने आली. तिने 17 फेब्रुवारीला मुलीचे अपहरण करून बीडला पलायन केले. त्यामुळे घाबरलेल्या नागपुरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी दोन पथके रवाना करून योग्य पध्दतीने तपास केला.
अंबाजोगाई येथून आरोपी राणीला ताब्यात घेऊन तिच्याकडून मुलीला ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक विचारणा केल्यानंतर ती सात महिन्यांची गर्भवती असताना मिस कॅरेज झाले होते. सासरच्या मंडळींनी दाखविण्यासाठी त्यामुळे तिने मुलीचे अपहरण केल्याचे तपासात सांगितले.
दरम्यान, संबंधित तरूण-तरूणीचा तपास लागला असून त्यांनी लग्न करावे, यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत. त्यांनी मुलीचे संगोपन करण्यास नकार दिल्यास दिघीतील शिशु संगोपन केंद्रात मुलीला ठेवण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शानाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, प्रमोद कठोरे, विजय जगदाळे आदींनी केली.










Leave a Reply