Pimpri News: एमआयडीसीचा गुरुवारचा पाणीपुरवठा बंद
Pckhabar- एमआयडीसीच्या रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम येत्या (गुरुवारी) करण्यात येणार असल्याने एमआयडीसीचा सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी)च्या जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम गुरुवारी केले जाणार आहे. त्यामुळे एमआयडीसीचा पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी व्ही, एसएसएनएल. दिघी, तळवडे, चाकण, देहूरोड, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीचे उपअभियंता कल्पेश लहिवाल यांनी केले.










Leave a Reply