आदित्य बिर्ला रुग्णालयावर कारवाईचा आदेश

पिंपरी : चिंचवड येथील आदित्य बिर्ला रूग्णालयावर कारवाई करावी, असे आदेश महापौर माई ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.
पिंपरी पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या.
राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलैला कोरोनामुळे आदित्य बिर्ला रुग्णालयात निधन झाले आहे. बिर्ला रुग्णालयावर विविध आरोप केले जात आहे. नगरसेवकांनीही आज महासभेत आदित्य बिर्ला रुग्णालयांच्या विरोधात तक्रारी केल्या. बिलाची आकारणी जादा केली जात आहे. त्यांच्या बिलांची तपासणी करण्यात यावी. रुग्णांची हेळसांड केली जाते, असे विविध आरोप रुग्णालय प्रशासनावर केले. त्यावर महापौर उषा ढोरे यांनी या रूग्णालयावर कारवाई करावी, असे आदेश आयुक्तांना दिले. तसेच कोरोनाबाधित नगरसेवकांना चांगले उपचार केले जावेत. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, असाही आदेश महापौरांनी आयुक्तांना दिला आहे.
फोटो- बिर्ला नावाने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *