Pimpri crime news: ‘दृश्यम’  पाहून कामावरून काढलेल्या कर्मचार्‍याने व्यावसायिक उनावणे यांचा केला खून

Pimpri crime news: ‘दृश्यम’  पाहून कामावरून काढलेल्या कर्मचार्‍याने व्यावसायिक उनावणे यांचा केला खून
Pckhabar-कामावरून काढल्याच्या रागातून माजी कर्मचार्‍याने चार साथीदारांच्या मदतीने व्यवसायिक आनंद उनावणे यांचे अपहरण करून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार मुख्य आरोपींसह सात आरोपींना अटक केली आहे. दृश्यम स्टाईलने एक वर्षापासून कट रचून चार जणांच्या मदतीने त्याने हा गुन्हा केल्याचे समोर आले आहेत.

उमेश सुधीर मोरे (वय 28, रा. काळेवाडी), दीपक धर्मवीर चंडालिया (वय 34, रा. रावेत), सागर दत्तात्रय पतंगे (वय 28, रा. कटफळ, ता. बारामती), बाबू उर्फ तुळशीराम नथुराम पोकळे, अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. आरोपींनी खंडणीपोटी घेतलेले सोन्याचे दागिने कोणत्याही पावतीशिवाय खरेदी करणारे राकेश राजकुमार हेमणानी (वय 27, रा. पिंपरी), कपिल ग्यानचंद हासवाणी (वय 30, रा. पिंपळे सौदागर), प्रवीण नवनाथ सोनवणे (वय 22, रा. मदनवाडी, ता. इंदापूर) या तिघांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रभू पुजारी हा अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

फ्रेंड्स फंड इंडिया चीटफंड कंपनीचे कार्यकारी संचालक आनंद साहेबराव उनावणे (वय 42, रा. नर्मदा बिल्डिंग, नवीन म्हाडा वसाहत, मोरवाडी, पिंपरी) असे अपहरण आणि खून झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. याबाबत विष्णू साहेबराव उनावणे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रभू पुजारी उनावणे यांच्या चिटफंड कंपनीत मुख्य रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होता. त्याच्या वर्तणुकीवरून उनावणे यांनी त्याला एक वर्षापूर्वी कामावरून काढले होते. त्याचा पुजारी याच्या मनात होता. त्यावरून त्याने उनावणे यांना मारण्याचा तसेच त्यांच्याकडून मिळेल तेवढे पैसे उकळण्याचा कट रचला. त्याने अन्य चार आरोपींना विश्वासात घेतले. एक वर्षापासून हा कट रचला जात होता. 3 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री उनावणे यांच्या राहत्या घरापासून पाच जणांनी मिळून कारमधून उनावणे यांचे अपहरण केले. त्यांना खंडणी मागून लाखो रुपयांची खंडणी घेतली. उनावणे यांना पैसे गोळा करायला लावून आरोपी उमेश मोरे, दीपक चंडालिया यांनी मोपेड दुचाकीवरून येऊन खंडणीची रक्कम नेली.

आरोपींनी उनावणे यांना हिंजवडी, ताम्हिणी घाट मार्गे महाड येथे नेले. प्रवासादरम्यान आरोपींनी कारमध्ये उनावणे यांचा दोरीने गळा आवळून खून केला. उनावणे यांचा मृतदेह दगडाने ठेचून भोराव गाव, महाड येथील सावित्री नदीच्या पुलावरून फेकून दिला. उनावणे यांचा मृतदेह 6 फेब्रुवारी रोजी नदी पत्रात आढळला. आरोपींकडून 39 लाख 5 हजार 678 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *