Pimpri news: कोविड सेंटरच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून जनतेसमोर अहवाल मांडा; युवक काँग्रेसची मागणी
Pckhabar-युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊनच्या काळात सुरू केलेल्या कोविड सेंटरची (सीसीसी) वैद्यकीय व भांडार विभागाची चौकशी करून त्याचा अवहाल जनतेसमोर सादर करण्यात यावा ही मागणी करण्यात आली.
आयुक्तांनी याबाबत सखोल चौकशी करू असे आश्वासन दिले आहे व त्यामध्ये जे अधिकारी व पदाधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
या प्रसंगी शहर काँग्रेसचे नेते सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल , काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सेवादलचे मकरध्वज यादव, कबीर मुहम्मद पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे सरचिटणीस चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, कुंदन कसबे, विवेक भाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.







Leave a Reply