Dehu News: राष्ट्रवादी कामगार सेलच्या कामगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

ही बातमी शेअर करा.

 

Dehu News: राष्ट्रवादी कामगार सेलच्या कामगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व कामगार प्रतिनिधी मेळावा देहूगाव येथे पार पडला.

देहूतील संत कृपा मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्यात राज्यमंत्री तथा सोलापुर जिल्हाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आयोजक कामगार सेलचे उपाध्यक्ष योगेश जाधव, देहू राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश हगवणे यांच्या हस्ते खटकाळे यांचा पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.
मंत्री भरणे यांनी खटकाळे यांच्या कामाचे कौतुक करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ अध्यक्ष किशोर ढोकळे, सोमनाथ  शिंदे, राजेंद्र कोंडे, किरण देशमुख, उमेश महाराज मोरे इनामदार, उद्योजक विशाल परदेशी, दत्तात्रय येळवंडे, प्रविण बल्लाळ, संदीप गार्डे, विजय फिरके, बाप्पुसाहेब मुसुडगे, शैलेश चव्हाण, माणिक जाधव, राहुल साळुंके, कामगार बांधव, विविध कंपन्या मधील कामगार प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी योगेश जाधव यांनी स्मार्ट हेल्थ कार्ड, कामगारांना परवडणारी घरे आणि नव्याने सुरवात होणार्‍या कामगारांसाठीच्या हेल्पलाईन ची माहिती सविस्तर विषद केली.

कोरोना व कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार मिळालेल्याचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस चे ज़िल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर परंडवाल यांनी आभार मानले.


ही बातमी शेअर करा.