Pimpri Corona news: शहरात कोरोनाचे 236 रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्येचा दररोज आकडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. सोमवारी कोरोनाचे 236 नवे रूग्ण आढळले. एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 105 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात शनिवारअखेर 1 लाख 3 हजार 421 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 98 हजार 362 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 831 तर हद्दीबाहेरील 772 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी 1 हजार 76 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 455 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 625 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 527 घरांना भेटी देऊन 1 हजार 261 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.










Leave a Reply