Pimpri news: घरगुती गॅसचा काळा बाजार करणार्‍यांना सोडणार नाही:  पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

Pimpri news: घरगुती गॅसचा काळा बाजार करणार्‍यांना सोडणार नाही:  पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
Pckhabar- कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी घरगुती गॅसचा काळा बाजार करणार्‍यांना सोडणार नाही, असा सज्जड दम पिंपरी-चिंचवड पोलीस पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी दिला.

सांगवी परिसरातील भैरवनाथ आणि कंकरीया या दोन गॅस एजन्सीवर शनिवारी कारवाई केली. चार ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल 22 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 381 गॅस सिलेंडरच्या टाक्या, गॅस रिफेलींगचे साहित्य, 14 तीनचाकी टेम्पो, 22 मोबाईल फोन असा 24 लाख 49 हजार 670 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.

या दोन्ही गॅस एजन्सी राजकीय व्यक्तीशी संबंधित असल्याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना विचारले असता ते म्हणाले, सांगवी परिसरात केलेल्या या कारवाई तब्बल 381 गॅस सिलेंडर टाक्या जप्त करण्यात आल्या असून 22 जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात गॅस एजन्सी चालकांनाही सहआरोपी करण्यात येणार आहे. आरोपी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी घरगुती गॅसचा काळा बाजार करणार्‍यांना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आयुक्त पुढे म्हणाले, नागरिकांनी घरी वजन काटा ठेवावा. गॅस आल्यानंतर त्याच्या सीलची तपासणी करावी, वजन करून पहावे, किती वजन आहे, याची खात्री करावी. चुकीचे काही असल्यास गॅस एजन्सीला तक्रार करावी, असे आवाहन आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले. तसेच येत्या काही दिवसात गॅस एजन्सी चालकांची एक बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *