Pune News: पुणे महापालिका निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार संजय राऊत
Pckhabar-पुणे महापालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पुणे महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. तर, काँग्रेसला सोबत घेण्याचा विचार असल्याचे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत आज शनिवारी पुण्यात म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले, एकत्र लढणं हे सत्ता परिवर्तनाच्या दिशेने टाकलेलं पाऊल असतं. राज्यात महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढाव्यात, यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेत ज्या पक्षाची ताकद आहे, त्या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडी करावी असा विचार करण्यात येईल.
निवडणुका एकत्र कशा लढता येतील यावर आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. एकत्र निवडणूक लढली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. सत्ता काबीज करण्यासाठी मदत होईल, असंही राऊत म्हणाले.










Leave a Reply