Maval news: मावळवासियांना टोल नाही!

ही बातमी शेअर करा.

Maval news: मावळवासियांना टोल नाही!
Pckhabar-पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे आणि वरसोली टोलनाक्यावरी टोल वसुली मधून मावळवासियांना सुट देण्याची घोषणा एमएसआरडीसीए व आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केली.

टोल नाक्यावरील टोल आकारणी मधून मावळवासियांना संपूर्णपणे टोलमाफी मिळावी म्हणून टोल नाका संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, शहाजी पवार, एमएसआरडीसीए अधिकारी दिलीप शंकरवार, आयआरबी अधिकारी हेमंत रासवडकर, वामन राठोड, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगरसेवक किशोर भेगडे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, गणेश खांडगे, अमोल शेटे, अरुण भेगडे पाटील, नगरसेवक निखिल भगत, शोभा भेगडे, सचिन भांडवलकर, मिलिंद अच्युत, विश्वनाथ शेलार, कल्पेश भगत, महादेव तुपारे, मुन्ना मोरे, आशिष खांडगे  व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

मावळात सोमाटणे व वरसोली टोल नाक्यावर नागरिकांना टोल वसूली मधून माफी दिली आहे, असे सर्वपक्षीय बैठकीत एमएसआरडीसीए व आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यामुळे मागण्या मंजूर झाल्याने  उद्या (रविवार)  होणारे आंदोलन रद्द केल्याचे यावेळी टोल नाका संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले.


ही बातमी शेअर करा.