Pimpri Corona News:  शहरात आज कोरोनाचे 283 नवे रूग्ण

Pimpri Corona News:  शहरात कोरोनाचे 283 रूग्ण


Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्येचा दररोज आकडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. शुक्रवारी तर कोरोनाचे तब्बल 283 नवे रूग्ण आढळले. एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. तर 30 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात शुक्रवारअखेर 1 लाख 2 हजार 698 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 98 हजार 165 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 828 तर हद्दीबाहेरील 771 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 1 हजार 559 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 1 हजार 129 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 934 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 244 घरांना भेटी देऊन 823 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात गेल्या पाच सहा दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, तसेच गर्दीच्या ठिकाणी जावू नये. सुरक्षित अंतराचे पालन करावे. मास्क, सॅनीटायझरचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *