PCMC News:  स्थायी समितीत ‘या’ आठ नगरसेवकांची लागली वर्णी

PCMC News:  स्थायी समितीत ‘या’ आठ नगरसेवकांची लागली वर्णी

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर भाजपच्या चार, राष्ट्रवादीच्या दोन,
शिवसेनेच्या एक आणि अपक्षांना एक अशा आठ नगरसेवकांची वर्णी लागली आहे.  आज (गुरूवार) झालेल्या महापालिकेच्या सर्वसधारण सभेत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

भाजपतर्फे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या गटाचे नितीन लांडगे, रवी लांडगे यांना तर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या  गटातील शत्रुघ्न काटे आणि सुरेश भोईर यांना संधी मिळाली आहे.

भाजपसोबत संलग्न अपक्ष आघाडीच्या निता पाडाळे, शिवसेनेकडून मीनल यादव यांना तर राष्ट्रवादीकडून प्रवीण भालेकर आणि राजू बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *