PCMC News: श्रीमंत महापालिकेचा 7 हजार 112 कोटींचा अर्थसंकल्प सादर

PCMC News: श्रीमंत महापालिकेचा 7 हजार 112 कोटींचा अर्थसंकल्प सादर
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 2021-22 या आर्थिक वर्षाचे  5 हजार 586 कोटी 35 लाख रूपये आणि केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार 112 कोटी 1 लाख रूपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी गुरुवारी स्थायी समितीला सादर केला.

सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे होते. यावेळी स्थायी समितीचे सदस्यांसह अतिरिक्त आयुक्त अजित पवार,  विकास ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

महापालिकेचे हा 39 वा अर्थसंकल्प आहे. सभापती लोंढे यांनी दि.24 फेब्रुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत अंदाजपत्रकाच्या अभ्यासाकरिता सभा तहकूब केली आहे.

मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्प तयार केला आहे. अर्थसंकल्पावर त्यांची छाप आहे. त्यांची  दि.12 फेब्रुवारी रोजी पुण्यात नोंदणी महानिरीक्षकपदी बदली झाली. हर्डीकर प्रशासनाने तयार केलेला अर्थसंकल्प नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीला सादर केला.
सन 2021-22 या आर्थिक वर्षात र.रु. 5588.78 कोटी (आरंभिच्या शिल्लकेसह) उत्पन्न अपेक्षित आहे. व त्यात प्रत्यक्षात खर्च र.रु. 5586.35 कोटी होईल व मार्च 2022 अखेर र.रु. 2.43 कोटी इतकी शिल्लक राहील. 1 हजार 523 कोटी 23 लाख रूपयांच्य केंद्र व राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांच्या समावेशासह एकूण 7 हजार 112 कोटी 1 लाख रूपयांचा हा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *