Pimpri news: मेट्रो स्टेशनच्या कामांसाठी संत तुकाराम नगर येथील अंडरपास राहणार बंद

Pimpri news: मेट्रो स्टेशनच्या कामांसाठी संत तुकाराम नगर येथील अंडरपास राहणार बंद
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम जोरदार सुरू आहे.  मेट्रो स्टेशनच्या कामांसाठी संत तुकाराम नगर येथील अंडरपास सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत बंद राहणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.

पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर क्र.१ ए या उन्नत मेट्रो मार्गिकेस कालच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये सुधारणा करून ही अतिरिक्त मार्गिका उभारण्यात येईल. यासाठी ९४६ कोटी ७३ लाख एवढा खर्च येणार असून राज्य शासनावर १७० कोटी ३ लाख इतका खर्चाचा भार असेल.

दापोडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. मेट्रो स्टेशनच्या कामांसाठी संत तुकाराम नगर येथील अंडरपास सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत बंद राहणार आहे. तर सेवा रस्ता खुला असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *