
Maval news: मावळातील 11 शाळांना प्रेरणादायी पुस्तक संचाचे वाटप
Pckhabar- श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा, शिवजयंती निमित्त वाचनवेड संस्था, पुणे यांच्या विशेष सहकार्याने अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहुगांव यांच्या माध्यमातून मावळातील, आढले येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतील 11 शाळांना
प्रेरणादायी पुस्तक संचाचे वाटप बुधवारी करण्यात आले.
या पुस्तक संचाचा लाभ आढले बु. सह केंद्रातील आढले खु., चांदेकरवाडी, घोटकुलेवाडी खु.,घोटकुलेवाडी बु., पुसाणे, दिवड, सावळेवाडा, राजेवाडी, ओवळे, डोणे या 11 शाळांना झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलस्वामिनी महिला मंचाच्या मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या सौभाग्यवती सारिकाताई सुनिल अण्णा शेळके या होत्या. याप्रसंगी तळेगाव दाभाडे न.पा. नगरसेविका संगिताताई शेळके, रेश्माताई शेळके, केंद्रप्रमुख विजय मारणे, 11 शाळांचे मुख्याध्यापक, अभंग प्रतिष्ठान चे पदाधिकारी अध्यक्ष प्रवीण काळोखे , उपाध्यक्ष सुरेश गाडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, आढले ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व अभंग प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन राहुल जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सिताराम वाढवणे यांनी केले. विकास कंद यांनी मनोगतातून वाचन महत्व व कार्यक्रमाचे उद्दिष्ट अधोरेखीत केले.
कार्यक्रमासाठी ल.श्री.कांबळे, श्रीम. सरकटे मॅडम, माळी मॅडम, श्री.बनकर सर,श्री.घोलप सर, श्री.कदम सर व केंद्रातील शिक्षकांनी प्रयत्न केला.










Leave a Reply