Pimpri news: कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 30 एप्रिलपर्यंत मतदार याद्या अद्यावत करा; संरक्षण मंत्रालयाचे आदेश

 

Pimpri news: कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 30 एप्रिलपर्यंत मतदार याद्या अद्यावत करा; संरक्षण मंत्रालयाचे आदेश
Pckhabar- मतदारांची सुधारित अंतिम यादी येत्या 30 एप्रिल पर्यत जाहीर करा असे आदेश संरक्षण मंत्रालयाचे उपसंचालक राजेश कुमार साह यांनी नुकतेच खडकी पुणे देहुरोडसह देशातील 56 कँन्टोन्मेंट बोर्डांना बजावले आहेत. मतदार याद्या एप्रिलमध्ये जरी जाहीर झाल्या तरी काही तांत्रिक अडचणी व नियम व  कायद्यानुसार त्वरीत कँन्टोन्मेंट निवडणुका होणे शक्य नसुन पुढिल वर्षी या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.     
    मतदारांची सुधारित यादी प्रक्रियेचे काम तातडीने सुरु करुन अंतिम मतदार यादी 30 एप्रिलपर्यत जाहिर करण्याचे आदेश दिल्ली संरक्षण मंत्रालयाच्या वतिने खडकी कँन्टोन्मेंट बोर्डासह सर्व कँन्टोन्मेंट बोर्डांना बजावले आहे. पाच वर्ष मुदतीचे तसेच एक वर्ष मुदतवाढीचे कँन्टोन्मेंट बोर्ड 10 फेब्रुवारीला बरखास्त करण्यात आले. त्या नंतर दोन दिवसात संरक्षण मंत्रालयाकडुन अंतिम मतदार संबधीचे आदेश आल्याने त्रिसदस्यीय समितीवर नागरिक प्रतिनिधी अर्थात उपाध्यक्ष पदी निवड व्हावी या करिता डोक्याला बाशिंग बांधुन बसलेल्या इच्छुकांमध्ये  त्रिसदस्यीय समिती येईल की कँन्टोन्मेंट निवडणुक होईल या बाबत संभ्रम निर्माणा झाला आहे.
    कॅन्टोन्मेंट निवडणुक कलम 10(1) आणि 12 नुसार दरवर्षी मतदार यादी सुधारणेचे काम केले जाते. मागील वर्षी जुलैमध्ये सुधारित मतदार याद्यांचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र कोरोना संकटामुळे संरक्षण मंत्रालयाच्या वतिने सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांना सुधारीत मतदार याद्यांच्या कामास तात्पुरती स्थगती देण्यात आली होती. सदर प्रक्रीया पुन्हा राबवुन मतदारांची सुधारीत यादी 30 एप्रिल पर्यत जाहीर करण्या बाबतच्या सुचना संरक्षण मंत्रालयाच्या वतिने केल्या आहेत. एप्रिल अखेर सुधारीत मतदार याद्या जाहिर झाल्या तरी मे महिन्यात निवडणुका होणे अशक्य आहे. मतदार याद्या अद्यावत प्रक्रीया 30 एप्रिलला पुर्ण झाल्या नंतर 45 दिवस अगोदर निवडणुक घेण्या संबंधीच्या सुचना येणे कायदा व नियमा नुसार बंधनकारक आहे. त्यानुसार जुनच्या मध्यामध्ये हा 45 दिवसाचा कालावधी पुर्ण होतो. जुन महिन्यापासुन पुढील 4 महिने पावसाळा असल्याने या कालावधीत निवडणुका घेणे शक्य नसल्याने कॅन्टोन्मेंट निवडणुका कदाचित वर्षअखेर अथवा  पुढिल वर्षाच्या प्रारंभी जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुका होईपर्यत त्रिसदस्यीय बोर्ड अस्तित्वात राहु शकते.
    कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षा कार्तिकी हिवरकर यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधला असता त्या म्हणाले की, मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम दरवर्षी केले जाते. मागिल वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सदर काम संरक्षण मंत्रालयाच्या वतिने स्थगित ठेवण्याचे आदेश सर्व कँन्टोन्मेंट बोर्डास बजावले होते. मतदार याद्यांचे काम पुर्ण झाल्या नंतर ही मे महिन्यात काही तांत्रिक बाबी नियम व कायद्याचे बंधन अनुसार निवडणुका घेणे शक्य नाही. तसेच सुधारीत कँन्टोन्मेंट कायदा संदर्भातील विषय अजुन केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे. येत्या अधिवेशनात तो विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे. सुधारीत कँन्टोन्मेंट कायद्यानुसार कदाचित निवडणुका या वर्षीच्या अखेरीस अथवा पुढिल वर्षाच्या प्रारंभीस होण्याची शक्यता आहे. असे त्यांनी या बाबत स्पष्टीकरण केले.
      एकंदरीत कँन्टोन्मेंट बोर्डामध्ये या वर्षाअखेर पर्यंत त्रिसदस्यीय समिती आस्तित्वात येईल. निवडणुका मे मध्ये न होता पुढील वर्षी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *