Pimpri Corona news: शहरात 142 नवे कोरोना रूग्ण
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहरात
70 ते 80 एवढी वाढणारी रूग्णवाढ शंभरच्या पुढे गेली आहे. मंगळवारी 142 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. तर 36 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात मंगळवारअखेर 1 लाख 2 हजार 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 98 हजार 63 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 1 हजार 827 तर हद्दीबाहेरील 771 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मंगळवारी 1 हजार 147 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 728 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 873 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 213 घरांना भेटी देऊन 668 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.










Leave a Reply