Nigdi news: ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक वामनराव अभ्यंकर यांचे निधन
Pckhabar- ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्राचे संस्थापक वामनराव अभ्यंकर यांचे हृदयक्रिया बंद पडून आज सकाळी साडेनऊच्या सुमारास निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
अभ्यंकर गेल्या तीन महिन्यापासून आजारी होते. त्यांना काही दिवसांपूर्वी न्युमोनिया ही झाला होता. काल सोमवारपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज सकाळी त्यांचे निधन झाले.
वामनराव अभ्यंकर यांचा परिचय
संस्थापक, ज्ञान प्रबोधिनी, निगडी केंद्र
ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे १९६९ पासून कार्यास प्रारंभ.
ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथे ३२ वर्षांपासून केंद्रप्रमुख या नात्याने कार्यरत.
Biography
मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह.
पंचकोशाधारित गुरुकुल चे संस्थापक.
सुमारे ३० भागवत सप्ताहांमध्ये प्रवचने.
प्रकाशित पुस्तके
नेतृत्वाचे पैलू
सस्नेह नमस्कार
एकविसाव्या शतकासाठी शिक्षण
चिंतनिका
विद्याव्रत संस्कार-पंचकोश विकसनाचा संकल्प
शिक्षणाचे पंचाधार
प्राप्त विशेष पुरस्कार
Best Citizen of India Award – International Publishing House
साने गुरुजी पुरस्कार – शिक्षण मंडळ, कराड
दधीची पुरस्कार – दि एज्युकेशन सोसायटी, अंबरनाथ
गीता गौरव पुरस्कार – गीताधर्म मंडळ, पुणे
Advertisement











Leave a Reply