Accident News: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघात; पाच जण ठार, पाच गंभीर जखमी
Pckhabar- टेम्पो, ट्रेलर, दोन कार एकमेकांवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जास्त पाच जण जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग, की.मी. नंबर ३६ येथे आज पहाटे घडला. हा अपघात इतका भीषण होता यामध्ये दोन्ही कारचा चक्काचूर झाला.
पुण्याहून मुबंईकडे जाताना बोरघाट उतरताना फुडमॉल जवळ हा झाला अपघात. या अपघातातील दोन जखमीनां अष्टविनायक (पनवेल) आणि अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात आणि एकाला इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मृतांना खोपोली रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिली. टेम्पो पलटी झाल्यावर मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. या चारही गाड्यांवर पाठीमागून येणारा टेम्पो धडकल्याने अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघाताचे दोन्ही कारचा चक्काचुर झाला आहे.
या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमावरुन परतताना हा अपघात झाला. तर अन्य दोन कार सोबत होत्या. परंतु, घाटात मुबंईकडे जाताना दोन कार पुढे निघुन गेल्या आणि या दोन कारचा अपघात झाला.
या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डॉ. वैभव वसंत झुझांरे (41, नेरुळ) याच्यांसह त्यांची पत्नी वैशाली झुंझारे (38), आई उषा झुंझारे (63), पाच वर्षांची मुलगी श्रिया झुंझारे (5) या चौघांचा मृत्यू झाला आहे.
तर मंजू प्रकाश नहार (वय- 58,इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम,) असे ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
जखमी पुढीलप्रमाणे:
अर्णव झुंझारे, स्वप्नील सोनाजी कांबळे (30), प्रकाश हेमराज नाहर (65), किशन चौधरी, काळूराम जमनाजी जाट हे या अपघातात जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Advertisement











Leave a Reply