Sangvi Crime news: माजी नगरसेवकाने बँकेला लावला अडीच कोटींचा चुना

 

Advertisement

Sangvi Crime news: माजी नगरसेवकाने बँकेला लावला अडीच कोटींचा चुना
Pckhabar- बनावट कागदपत्रे तयार करून श्री छत्रपती अर्बन को-ऑप. बँकेची दोन कोटी 69 लाख 83 हजार 855 रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी माजी नगरसेवकासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे निलख येथे घडली.

माजी नगरसेवक विलास एकनाथ नांदगुडे (अध्यक्ष), देवेंद्र मोहन बारटक्के, रवींद्र सोनवणे (दोघेही मॅनेजर), बँकेच्या तीन महिला अधिकारी, ज्ञानदेव बबन खेडकर, रामलिंग केदारी, तेजस जाधव, यशवंत जगन्नाथ पाटील (चौघेही कर्जदार) अशी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भगवान तुकाराम धोत्रे (वय 51 रा. मु. पो. देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री छत्रपती अर्बन को ऑप बँक लिमिटेडच्या विशाल नगर, पिंपळे निलख येथील शाखेत ही फसवणूक 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2014 या कालावधीमध्ये घडली. आरोपींनी आपसात संगणमत करून खोटे आणि बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे श्री छत्रपती अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडच्या पिंपळे निलख येथील शाखेत दिली. या कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी कर्ज आणि ठेवीत गैरव्यवहार करून खोटे हिशोब नोंदवले.

बँकेची दोन कोटी 69 लाख 83 हजार 855 रुपयांची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून बँकेचे सभासद ठेवीदार निबंधक यांचा विश्वासघात करून फसवणूक केली.

सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *