Chinchwad Crime news: हातचलाखी करून व्यावसायिकाला 24 हजाराचा गंडा

 

Chinchwad Crime news: हातचलाखी करून व्यावसायिकाला 24 हजाराचा गंडा
 Pckhabar- वेफर खरेदी करण्याच्या बहाण्याने एका वेफर विक्रेत्याला बोलण्यात गुंगवून हातचलाखीने त्याच्याकडील 24 हजार रूपये घेऊन अनोळखी इसम पसार झाला. हा प्रकार रविवारी दुपारी एक वाजता चिंचवड येथे घडला.

    दिगंबर नामदेव मुडबे (वय-25, रा. काळेवाडी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिर्यादी हे बालाजी वेफरचे डिलर आहेत. रविवारी लिंकरोड येथील एका दुकानात वेफर देण्यासाठी गेले होते. वेफर खरेदीच्या करण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ अनोळखी इसम आला. सुट्या पैशाच्या बदल्यात दोन हजारांच्या नोटा देतो, असे बोलण्यात गुुगवून त्यांच्याकडील 24 हजारांची रोकड घेऊन अनोळखी इसम पसार झाला. फौजदार रनवरे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *