PCMC News: महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली, राजेश पाटील नवे आयुक्त
Pckhabar- पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची शुक्रवारी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर हर्डीकर यांची नोंदणी महानिरीक्षक म्हणून पुण्यात बदली झाली आहे.
हर्डीकर हे 23 एप्रिल 2017 रोजी पिंपरी महापालिकेत बदली झाली होती. त्यांचा पावणेचार वर्षांचा कालावधी झाला आहे.
ओडिशामध्ये प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय काम करणारे राजेश पाटील 2005 मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या स्कील इंडिया उपक्रमांतर्गत त्यांनी काम पाहिले आहे. राजेश पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत.
स्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये राजेश यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयएएस अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. 2005मध्ये ते यूपीएससी पास झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली. ओडिशामध्ये काम करताना 2008मध्ये महा नदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. राजेश यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राजेश यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले असून, ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे त्यांचे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.










Leave a Reply