Delhi News: बैलाचा संरक्षित प्राणी हा दर्जा मागे घ्या: खासदार अमोल कोल्हे यांची मागणी
Pckhabar- ग्रामीण भागातील अर्थचक्र पुर्ववत करण्यासाठी बैलगाडा शर्यत सुरू करणे महत्त्वाचे आहे. बैलगाडा शर्यतीसाठी खिल्लार या जातीच्या बैलांचा वापर केला जातो. परंतु बैल या प्राण्यास केंद्र सरकारने संरक्षित प्राणी हा दर्जा दिला आहे. त्यामुळे बैलाला दिलेला ‘संरक्षित प्राणी’ हा दर्जा मागे घ्यावा, आशीर्वाद मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धव्यवसाय मंत्री Giriraj Singh यांच्याकडे केली.
खासदार कोल्हे म्हणाले’ महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात अतिशय महत्त्वाची असणारी बैलगाडा शर्यत पुर्ववत सुरु व्हावी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. परंतु बैल या प्राण्यास केंद्र सरकारने संरक्षित प्राणी हा दर्जा दिला आहे. यामुळे उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली.
याबाबतची अंतीम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या शर्यती पुन्हा सुरु झाल्यास ग्रामीण भागात थंडावलेले आर्थिक चक्र देखील पुन्हा पुर्ववत होईल. यासाठी बैल या प्राण्याचा ‘संरक्षित प्राणी’ हा दर्जा मागे घेण्याची गरज आहे.










Leave a Reply