Chinchwad news: शाह यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केली नाही :  चंद्रकांत पाटील

 

 

Chinchwad news: शाह यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केली नाही :  चंद्रकांत पाटील
Pckhabar-भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केली नाही. मात्र शिवसेनेला आणि खासदार संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चिंचवड येथे केली.

चिंचवड येथील पुनरूथ्थान समरसता गुरुकुलमला बुधवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर उषा ढोरे, महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी पक्षनेते एकनाथ पवार, स्वीकृत नगरसेवक अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे, सदाशिव खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा पुणेरी पगडी, विठ्ठल मूती, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पाटील म्हणाले, अमित शहा हे खर बोलले ते शिवसेनेला फार झोमले. त्यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषाच केली नाही. ते म्हणाले की गेल्या 15 महिन्यात सरकारचा जो व्यवहार सुरू आहे, तो आम्ही पाच वर्ष राज्य असताना केला असता तर शिवसेना संपली असती आणि ही वस्तुस्थितीही आहे. आम्ही कधी खुन्नसने वागलो नाही.

गिरीश प्रभुणे यांना एकीकडे पद्मश्री जाहीर झाला आणि दुसरीकडे महापालिकेने त्यांच्या पुर्नरूथ्थान समरसता गुरूकुलम या संस्थेला थकीत मिळकतकर वसुलीसाठी नोटीस बजावली होती. यावरुन महापालिका प्रशासन आणि सत्ताधार्‍यांवर चौफेर टीका झाली होती. याबाबत पाटील म्हणाले की, शहरात भाजप जरी सत्तेत असेल तरी त्यांना हा मिळकतकर माफ करता येणार नाही. मिळकतकर माफीचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवावा लागेल. त्यानंतर नगरविकासचे खाते ती नोट कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवेल. त्यांनी मंजुरी दिल्यानंतरच हा मिळकतकर माफ होईल.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *