Pimpri news: व्यावसायिक आनंद उनवणे हत्या प्रकरण, चार जणांवर गुन्हा; तपासासाठी सहा पथके रवाना

Pimpri news: व्यावसायिक आनंद उनवणे हत्या प्रकरण, चार जणांवर गुन्हा; तपासासाठी सहा पथके रवाना
Pckhabar-चिटफंड व्यावसायिक आनंद साहेबराव उनवणे यांचे तीन ते चार जणांनी त्यांच्या राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून अपहरण करून त्यांचा खून केला. महाडमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर अर्जुन चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

 आनंद उनवणे यांचा चिटफंडचा व्यवसाय आहे. आनंद उनवणे  3 फेब्रुवारी रोजी त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभे होते. त्यावेळी  एका मोटारीतून तीन ते चारजण आले. आरोपी आणि आनंद यांच्यात झटापट झाली. त्यानंतर आरोपींनी आनंद यांना मोटारीत जबरदस्तीने बसवून त्यांचे पैशांच्या हव्यासापोटी अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचेही पथक समांतर तपास करीत आहे. या प्रकरणातील काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. मात्र, उनवणे यांचे अपहरण आणि खून कशासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींना अटक केल्यानंतर आनंद यांच्या खुनामागील खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *