Pimpri news: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गोविंद घोळवे यांनी केले अभिनंदन

Pimpri news: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गोविंद घोळवे यांनी केले अभिनंदन
Pckhabar- काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती दिल्याबद्दल नाना पटोले यांचे शिवसेनेचे राज्य संघटक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी अभिनंदन केले.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारकडून अधिक लोकाभिमुख कामे होण्यासाठी पटोले यांच्या नेतृत्वाचा अनुभव कामी येईल असे घोळवे म्हणाले. या भेटीत कुठलेही राजकारण नसल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.क्षनाना पटोले भारतीय जनता पक्षात असल्यापासून ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे आणि त्यांच्या स्नेह आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याण- डोंबवली येथे घोळवे आणि पटोले यांची भेट झाली. या प्रसंगी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल नाना पटोले यांचे अभिनंदन केले.

या प्रसंगी जुन्या आठवणींवर दोघांमध्ये चर्चा झाली. नाना पटोले हे शेतक-यांचे नेते असून मुळचे विदर्भातील आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आणखी लोकाभिमुख करण्यासाठी त्यांचा अनुभव उपयोगी पडेल असा आशावाद घोळवे यांनी व्यक्त केला.
सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस राज्यात सत्तेत एकत्र असल्याने तीनही पक्षांमध्ये समन्वयाने काम चालू आहे. मात्र आमच्या भेटीत कुठल्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *