Nigdi news: हनुमंत तापकीर यांना, ‘साने गुरुजी मूल्यजागर’ पुरस्कार जाहीर
pckhabar-यमुनानगर येथील माॅर्डन हायस्कूलमधील उप शिक्षक हनुमंत तापकीर यांना राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि इंद्रायणी विद्यामंदिर तळेगाव या संस्थांच्या सयुंक्त विद्यामाने, यंदाचा ” साने गुरुजी मूल्यजागर ” पुरस्कार जाहीर झाला आहे.
राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन (२२वे) तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात दि. २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटन मराठी साहित्यातील जेष्ठ समीक्षक तथा आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी चंद्रकांत वानखेडे आहेत तर स्वागताध्यक्ष मा. रामदास काकडे आहेत.
यावेळी तापकीर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.










Leave a Reply