Pimpri news: पुणे – लोणावळा दरम्यान लोकल सेवा सुरू करा : खासदार बारणे

Pimpri news: पुणे – लोणावळा दरम्यान लोकल सेवा सुरू करा : खासदार बारणे

Pckhabar- कोरोनामुळे सुमारे अकरा महिन्यापासून बंद असलेली पुणे – लोणावळा दरम्यान लोकल सेवा व पुणे- मुंबई रेल्वे सेवा सिहंगड एक्सप्रेस व सह्याद्री एक्सप्रेस या गाड्या त्वरीत चालू करण्यात यावी अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली.

दिल्ली येथे खासदार बारणे यांनी केंद्रीय मंत्री गोयल यांची सोमवारी भेट घेतली.
सर्वसामान्य नागरिकांना लोकल सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना रूग्ण संख्याही कमी होत आहे. तसेच मुंबईतही सर्वसामान्य नागरिकांना लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवरपुणे – लोणावळा दरम्यान लोकल सेवा व पुणे- मुंबई रेल्वे सेवा सिहंगड एक्सप्रेस व सह्याद्री एक्सप्रेस या गाड्या त्वरीत चालू कराव्यात,अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *