Lonavala news: जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग – राज्यपाल कोश्यारी

 

Lonavala news: जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग – राज्यपाल कोश्यारी
Pckhabar- जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग आहे . संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे . मन नियंत्रित करण्यासाठी योग , दर्शन , शास्त्राची गरज आहे असे असं मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले . लोणावळा येथील कैवल्यधाम योगा संस्थेच्यावतीने देण्यात येणारा स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार 2020 चे वितरण समारंभात ते बोलत होते .

अपर पोलीस महासंचालक डॉ . भूषणकुमार उपाध्याय यांना योगाच्या प्रोत्साहन व विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल तर योगाचार्या संध्या दिक्षीत यांना कैवल्यधाम योगा संस्थेतील सेवा व योगाच्या प्रसाराबद्दल सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले . यावेळी कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष महेशानंद , सचिव ओमप्रकाश तिवारी , मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख , प्राध्यापक आर.एस , भोगल यांच्यासह संस्थेतील योगा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते . 

यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले , मनुष्य जसा विचार करतो तसे त्याचे मन कार्य करते . त्यामुळे चांगले विचार करा व त्या विचारानुसार कृती करा .  अपर पोलीस महासंचालक डॉ . उपाध्याय म्हणाले , योग ही देश , विश्व आणि संस्कृतींची ताकद आहे . योगामुळे शरीर , मन , चेतनांचा विकास होतो . वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात योगाला महत्त्वाचे स्थान आहे . योगाचार्या संध्या दिक्षीत यांनी पुरस्कार प्रदान केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले . 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संस्थेतील दार्शनिक साहित्य संशोधन विभागाच्या ग्रंथालयाची पाहणी करून विभाग प्रमुख राजेश्वर मुखर्जी यांच्याकडून ग्रंथालयाबाबत माहिती जाणून घेतली , त्यानंतर संस्थेतील परिसराची पाहणी केली तसेच स्वामी कुवलयानंद यांच्या समाधीचे दर्शन घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल त्रिवेदी यांनी केले तर आभार सुबोध तिवारी यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *