Pimpri news: भाजपा आर्थिक प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र संयोजकपदी प्रा. संजीवनी पांडे
Pckhabar-भारतीय जनता पार्टीच्या आर्थिक प्रकोष्ठाच्या पश्चिम महाराष्ट्र संयोजकपदी पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्या प्रा.संजीवनी पांडे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश आर्थिक प्रकोष्ठचे संयोजक मिलिंद कानडे, प्रकोष्ठ प्रभारी खासदार मनोज कोटक यांनी पांडे यांची निवड केली आहे.
संजीवनी पांडे या मॅनेजमेंटच्या फॅकल्टी असून चिंचवडच्या प्रतिभा कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सुमारे 15 वर्षे नामांकीत लिमिटेड कंपनीमध्ये टॉप मॅनेजमेंट लेव्हलवर काम करण्याचा प्रदिर्घ अनुभव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या शैक्षणिक, सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांचा कार्पोरटचा अनुभव आणि संघटनात्मक कौशल्य पाहता पक्षाने त्यांच्यावर आर्थिक प्रकोष्ठाच्या पश्चिम महाराष्ट्र संयोजकपदाची जबाबदारी सोपविली आहे.
”पक्षाने माझ्यावर विश्वास दाखविला असून मोठी जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी यशस्विरित्या पार पाडून पक्षाचा विश्वास सार्थ ठरविणार”, असा विश्वास पांडे यांनी निवडीनंतर व्यक्त केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, खासदार मनोज कोटक, प्रदेश संयोजक मिलींद कानडे यांचे त्यांनी आभार मानले. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचे निवडीसाठी मोठे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.










Leave a Reply