Chikhali news : काळी जादू करणारा गजाआड
Pckhabar- जादूटोणा केल्यास तुमची प्रगती होईल, असे सांगणाऱ्या एका मांत्रिकाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई काल पहाटे साडेतीन वाजता कुदळवाडी येथे करण्यात आली.
गौतम पंढरीनाथ मोरे (वय-40, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी
संतोष छबुलाल बांगर यांनी चिखली पोलिसांनी ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगर कर्तव्यावर असताना कुदळवाडी परिसरात एक जण हातामध्ये काळया रंगाची बॅग व काळया रंगाचे गाठोडे संशयास्पद घेवुन जात होता. पोलिसांना पाहून संशयित इसम पळून जावू लागला.
पोलिसांनी त्याला पकडून विचारपूस केली. त्याच्या हातातील काळया रंगाची बॅग व काळया रंगाचे गाठोडे ताब्यात घेवुन पाहणी केली असता जादुटोणा करण्यासाठी लागणारे पुजेचे साहीत्य व एक चाकु व एक विवो कंपनीचा मोबाईल मिळुन आला. सदर साहित्यबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले कि, सदरचे साहित्य हे मी पुजा करण्यासाठी इसम नामे गोविंद खंडु मोरे,यांच्याकडे चाललो आहे. त्यावरून गोविंद मोरे, यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगितले कि, गौतम पंढरीनाथ मोरे, हा जादुटोणा करण्यासाठी पुजा अर्चा करतो. “मी तुमच्या घरी पुजा केलीतर तुमची खुप प्रगती होईल असे त्याने मला सांगितले होते.” यावरून यातील आरोपी याने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंधक घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनिमय २०१३ अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांची जाहीरात आचरण, प्रचार किवां प्रचालन केले करून अपप्ररेणा देईल किवां कोणतीही कृती किवां अपराध करण्याचा प्रयत्न करीत असताना तो मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
चिखली पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply