Pimpri News: ‘स्थायी’ सदस्यपदासाठी इच्छुकांची फिल्डिंग;अध्यक्षांसह आठ सदस्यांची संपणार मुदत  

Pimpri News: ‘स्थायी’ सदस्यपदासाठी इच्छुकांची फिल्डिंग;अध्यक्षांसह आठ सदस्यांची संपणार मुदत  
Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारीला संपुष्टात येत असून स्थायीत वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजप चार, राष्ट्रवादी दोन, शिवसेना आणि अपक्ष आघाडीच्या एका सदस्यांची स्थायीत नियुक्ती केली जाणार आहे.

स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा 1 नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य समितीत आहेत. त्यातील स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सदस्य आरती चौंधे, शीतल शिंदे, राजेंद्र लांडगे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि भाजप संलग्न अपक्ष आघाडीच्या झामाबाई बारणे यांचा दोन वर्षाचा कार्यकाल 28 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती 18 फेब्रुवारीच्या महासभेत केली जाणार आहे.

दरम्यान, महापालिकेतील स्थायी समिती ही अत्यंत महत्वाची समिती आहे. या समितीच्या माध्यमातून सर्व आर्थिक बाबींचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे या समितीवर वर्चस्व असणा-यांचा महापालिका कारभारात बोलबाला असतो. पालिकेचा कारभार ही समिती हाकत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *