Dehuroad BJP News: नगरपंचायत, कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीच्यादृष्टीने तयारीला लागा- अविनाश बवरे
Pckhabar-आगामी काळात नगरपंचायत, कँन्टोन्मेंट बोर्ड, महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन भाजपाचे पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे यांनी केले. तसेच बुथ व्यवस्थापन, पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वांनी समन्वय ठेवून काम करावे, असेही बवरे म्हणाले.
देहूरोड भाजप मंडल बुथ कार्यकर्ता संपर्क अभियान (मेरा बुथ सबसे मजबुत) अंतर्गत शनिवारी देहूरोड येथील जैन स्मारकात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीची सुरूवात जगदगुरू तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून झाली. याप्रसंगी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे, देहूरोड भाजपचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार, देहू भाजपचे अध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, तुकाराम नाना जाधव, लहु मामा शेलार, उमाशंकर सिंग, संजय जंबुकर, संदिप परंडवाल, सागर मुसूडगे, सचिन काळोखे, संभाजी बाळसराफ, अभय पडोसकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.
यावेळी देहू शहर भाजपच्या विविध नियुक्या तसेच नियुक्ती पत्र देण्यात आल्या. यामध्ये देहू शहर भाजपा कलाकार आघाडीच्या अध्यक्षपदी प्रेमकुमार राधाबाई बाबू माने, देहू शहर भाजपा सोशल मीडियाच्या अध्यक्ष पदी शशिकांत भोईटे, देहू शहर भाजपा किसान आघाडीच्या उपाध्यक्षपदी संभाजी शांताराम बाळसराफ यांची निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस अविनाश बवरे, उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे यांच्या हस्ते देण्यात आले.










Leave a Reply