Kiwale news : फडणवीसांनी चार वर्षे स्वप्न बघतच रहावे- उद्योगमंत्री सुभाष देसाई

Kiwale news : फडणवीसांनी चार वर्षे स्वप्न बघतच रहावे- उद्योगमंत्री सुभाष देसाई
Pckhabar- ‘महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार स्थीर झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा वाढता विश्वास आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चार वर्षे सत्तेचे स्वप्न बघत रहावे लागेल’, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लगाविला.
किवळे येथे देसाई यांनी आज (शनिवारी) माध्यमांशी संवाद साधला. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या पदासाठी पुन्हा एकदा निवडणूक होणार आहे. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी ’ऑपरेशन लोटस’चे संकेत दिले आहेत. आम्ही फासे पलटवणार, शिडीशिवाय आम्ही फासे पलटवू आणि हे फासे खूप मोठे असतील, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, ते स्वप्न बघत आहेत. त्यांना चार वर्षे स्वप्न बघत रहावे लागेल. सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे असे अंदाज व्यक्त करण्याखेरीज आता तरी त्यांच्या हातात काही नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *