Bhosari crime news: पतीच्या मित्रांनीच केला महिलेवर बलात्कार
Pckhabar-पतीच्या मित्रासोबत कारमधून गावी जाताना दोघांनी महिलेवर बलात्कार करून त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ पतीला दाखवून बदनामी करण्याची धमकी देत आळंदीत लॉजवर घेऊन जात पुन्हा बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार भोसरी येथे नुकताच उघडकीस आला.
मारूती ऊर्फ बाळ्या सोपान जगदाळे (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), अमित बलदेव मानकर (वय-28, रा. हिरा रेसेडन्सी, आळंदी रोड, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित हा पिडीत महिलेच्या पतीचा मित्र आहे. त्यांना त्यांच्या गावी गंगाखेड येथे जायचे होते. त्या आरोपीच्या कारने मुलासह गावी जात होत्या. अहमदनगरच्या पुढे गेल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्यांच्यावर कारमध्येच जबरदस्तीने बलात्कार केला. याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर फिर्यादी या पुण्यात आल्यानंतर आरोपींनी त्यांना व्हिडीओ दाखवून नवर्याला व्हिडीओ दाखविण्याची धमकी दिली. तसेच त्यांना आंळदीतील एका लॉजवर घेऊन जात पुन्हा बलात्कार करत पैशांची मागणी केली. या त्रासाला कंटाळलेल्या फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक पी. एम. कदम तपास करत आहेत.
Bhosari crime news: पतीच्या मित्रांनीच केला महिलेवर बलात्कार










Leave a Reply