Dehu news: ‘प्राणायाम आणि योग साधना’ शिबिर

Dehu news: ‘प्राणायाम आणि योग साधना’ शिबिर
Pckhabar-जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू योग विद्याधाम श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने ‘प्राणायाम आणि योग साधना’ शिबिराचे दि.१३  ते दि.१६ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.

देहूगावातील  वैकुंठ गमनस्थान, गोपाळपुरा येथे सकाळी ५.३० ते ७.00 या वेळेत हे ‘प्राणायाम आणि योग साधना’ शिबिर होणार आहे. या शिबिरात त्र्यंबकेश्वर नाशिक येथील योग विद्या गुरुकुलच्या योगतज्ञ सौ.ऐश्वर्या जोशी या मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधान योग पुरस्कार विजेते योगाचार्य  डॉ.विश्वास मंडलीक, योगअध्यापक दत्तात्रय भसे उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरासाठी 100 रूपये
प्रवेश शुल्क आहे. नागरिकांनी शिबीरास येताना बसकर घेऊन येणे. देहूगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी
९८५०२२२१९२/ ९०२८३०८०९0/ ८८८८२९३०३२/ १८२२५०६५०८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *