Murder News: महिला पोलिसाच्या पतीचा हिंजवडीत खून

Murder News: महिला पोलिसाच्या पतीचा हिंजवडीत खून

Pckhabar-शाब्दिक वादातून पाच जणांनी मिळून मुंबईत कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचार्‍याच्या पतीचा खून केला. ही घटना   हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात घडली.

राजकुमार मुरलीधर घुगे (वय 48, रा. एमआयडीसी पोलीस वसाहत, अंधेरी ईस्ट, मुंबई) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत रमेश तुकाराम गायकवाड (वय 48, रा. कांदिवली, मुंबई ईस्ट) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नंदकुमार श्रीपतराव ढोकळे (वय 55), प्रमोद नंदकुमार ढोकळे (वय 32, दोघे रा. नारायण कॉम्प्लेक्स, हिंजवडी), प्रशांत नंदकुमार ढोकळे (वय 35, रा. जाधव वस्ती, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अन्य दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजकुमार आणि आरोपी नंदकुमार यांची गुरुवारी रात्री हिंजवडीमधील एका वाईन्स शॉपसमोर स्नॅक्स देण्याच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर फिर्यादी रमेश, मयत राजकुमार आणि त्यांचे मित्र लक्ष्मी चौकातील एका हॉटेलमधून जेवण करून हॉटेलच्या बाहेर आले असता आरोपींनी आपसात संगनमत करून राजकुमार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात राजकुमार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी रमेश यांना इथे न थांबता पुणे सोडून जाण्याची धमकी दिली. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मयत राजकुमार यांच्या पत्नी मुंबईत पोलीस कर्मचारी आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *