Dehu BJP News: महावितरण कार्यालयाला भाजपने ठोकले टाळे
Pckhabar- कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने बिलांची वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी देणारे हे सरकार किती असंवेदनशिल आहे हे यावरून दिसून येते. याविरोधात देहूगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाला शहर भाजपने टाळे टोकून तीव्र निषेध केला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरण कंपनी विरोधात शुक्रवारी सकाळी देहू भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे यांच्या नेतृवाखाली महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोको, हलाबोल आंदोलन केले.
या प्रसंगी माजी उपसरपंच संतोष हगवने, व्हा. चेअरमन नारायण तात्या पचपिंड, किसान मोर्चा आघाडी अध्यक्ष रवींद्र काळोखे, संभाजी बाळसराफ, संभाजी टिळेकर, पंडित मोईकर, संतोष चव्हाण, संदीप परंडवाल, सागर मुसूडगे, सचिन मराठे, सोपन पानसरे, शशिकांत भोईटे, करवीर शिवलिंग, शशिकांत टिळेकर, अथर्व गोरे तसेच ग्राहक, ग्रामस्थ उपस्थित होेते.
आंदोलकांनी महावितरण आणि महाविकास आघाडी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.












Leave a Reply