Wakad crime news: दोन डॉक्टरांनी किराणा दुकानदाराला लावला चुणा

Wakad crime news: दोन डॉक्टरांनी किराणा दुकानदाराला लावला चुणा
Pckhabar- किराणा साहित्य घरी टाकण्यास सांगून त्याचे पैसे न देता दुकानदाराची दोन डॉक्टरांनी तब्बल साडेचार लाखांची फसवणूक केली. हा प्रकार वाकड येथे घडला.
डॉ. आशुतोष दुबे (रा. सेंटर सोसायटी, वाकड), डॉ. तुषार पारीख उर्फ लोहार अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. याप्रकरणी अरुण कुमार अमरितलाल शुक्ला (वय 48, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे किराणा दुकान आहे. आरोपींनी त्यांच्या दुकानातून किराणा साहित्य खरेदी केली. हे साहित्य घरी टाकण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपींच्या घरी तेल, तांदूळ, गव्हाचे पीठ आदी साहित्य घरी दिले. त्याचे चार लाख 58 हजार 460 रूपये झाले. मात्र, आरोपींनी हे पैसे न देता दुकानदाराची फसवणूक केली.

वाकड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *