Pune news : गणिमी कावा काय असतो, हे महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ : उपमुख्यमंत्री अजित पवार

Pune news : गणिमी कावा काय असतो, हे महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ : उपमुख्यमंत्री अजित पवार
Pckhabar- ”आमची लोक घेऊन भारतीय जनता पक्षाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज केली. आता भाजपचे नगरसेवक मला भेटायला येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणिमी काव्या प्रमाणे मी काम करतो, गणिमी कावा काय असतो”, हे महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला दिला आहे.

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार का? याबाबत विचारले असता पवार बोलत होते.

मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. विकास कामानिमित्त भाजपचे नगरसेवक मला भेटत असतात. मात्र, भाजपने आमची लोक घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज केली. आता सासूचे दिवस गेले सुनेचे दिवस आले, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याचे संकेत दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी शेतकरी आंदोलन, पेट्रोल-डिझेल दरवाढ, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची रखडलेली नियुक्ती आदी मुद्यावर भाष्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *