Pimpri news: ११ महिन्यांनंतर
शाळेची घंटा वाजली…!
Pckhabar- कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे गेल्या ११ महिन्यापासून बंद असलेल्या शाळेची घंटा वाजली अन् शाळा विद्यार्थिनींच्या किलबिलाटाने गजबजून गेली.
पिंपरी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात विद्यार्थिनींना गुलाब फुल देऊन मोठ्या उत्साहात मुख्याध्यापिका शेटे मॅडम, पर्यवेक्षिका पाटील मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंदांकडून हार्दिक स्वागत करण्यात आले.
इ.५वी ते ८वी च्या विद्यार्थिनी शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे तसे ऑफलाईन शाळेचा पहिला दिवस म्हणावा लागेल प्रचंड उत्साहात शाळेत उपस्थित झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. शाळेबद्दलच प्रेम , त्यांच्या भावना शब्दाशब्दातून प्रकट होत होत्या. कधी एकदा सर्व शिक्षकांना भेटू असे झाले होते. त्यांच्याप्रमाणे आम्ही सुद्धा या दिवसाची वाट पाहत होतो म्हणूनच आमचे प्रेरणास्थान म्हणजे पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी माननीय रत्नपारखी साहेब आणि सहाय्यक विभागीय अधिकारी माननीय पवार साहेब तसेच विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका शेटे एस. एस. आणि माननीय पर्यवेक्षिका पाटील यू. बी. यांच्या मार्गदर्शनाखाली दोन – तीन दिवसांपासून विद्यार्थिनींच्या स्वागताची तयारी चालू होती. अतिशय नियोजनबद्ध असा आजचा कार्यक्रम झाला. पालकही यावेळी उपस्थित होते. थोडी भीती, थोडी उत्सुकता त्यांच्याही मनात होती. पालकांनीही विद्यार्थिनींचे कौतुकाने स्वागत केले. आलेल्या सर्व मुलींचे गुलाबपुष्प देऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. एकूणच आजचा दिवस खूपच आनंदात संपन्न झाला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शेटे मॅडम, पर्यवेक्षिका पाटील मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंदांकडून हार्दिक स्वागत करण्यात आले.












Leave a Reply